'ओ मेरी प्यारी बेहना' ; या अभिनेत्रींनी हटके पद्धतीने साजरं केलं रक्षाबंधन

By  
on  

अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि अभिनेत्री चैत्राली गुप्ते या अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत त्यांच वेगळं नाव कमावलं आहे. भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते या दोघींची जोडी देखील प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघींनी आजवर मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.

आज देशभर रक्षाबंधनाचा माहोल असताना आजच्या दिवशी भावाला राखी बांधून त्याने बहिणीचं रक्षण करावं असा संकेत आहे. पण मराठीतील काही अभिनेत्रींनी परंपरेचा नवा आयाम चाहत्यांसमोर आणला आहे.

अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते या बहिणींनी एकमेकींना राखी बांधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भार्गवीने रक्षाबंधनाचा हा खास फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे आणि या फोटोच्या खाली तिने छान कॅप्शन देखील दिले आहे. यात असं म्हटलं आहे की, 'या फोटोला कोणत्याही फिल्टरची गरज नाही. आमचं हे नातं आनंद निर्माण करण्यासाठी पुरेसं आहे'. याचबरोबर भार्गवीने चैत्राली लोकेश गुप्ते हिला टॅग करत 'नेहमी माझी काळजी घेणारी, माझ्याकडे लक्ष देणारी, माझीआश्वासक बहीण, तुला खूप खूप प्रेम' असं म्हटलं आहे. दरम्यान त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Recommended

Loading...
Share