'तुज्यात जीव रंगला' मधील पाठक बाईंनी बरकतला राखी बांधत साजरं केलं रक्षाबंधन ; पाहा हा खास व्हिडिओ

By  
on  

छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका तुफान गाजली. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेतील राणा-अंजली या कलाकारांप्रमाणे इतर कलाकार देखील लोकप्रिय झाले त्यातील एक कलाकार म्हणजे मालिकेतील राणादाचा मित्र अर्थात बरकत. मालिकेतला हा बरकत म्हणजे अभिनेता अमोल नाईक.

मालिकेत बरकत आणि अंजली यांचं नातं हे दीर आणि वहिनी असं असलं तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते भाऊ-बहीण आहेत. दर रक्षाबंधनला अभिनेत्री अक्षया देवधर अमोलला राखी बांधते. यंदाच्या रक्षाबंधनला देखील अक्षयाने अमोलला राखी बांधत उत्साहात रक्षाबंधन साजरी केली.

अक्षया आणि अमोलच्या रक्षाबंधनाचा खास व्हिडिओ अक्षयाने सोशल मीडियावर शेयर केला असून या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला 'ओ मेरी प्यारी बहना' हे गाणं वाजत असून व्हीडीओखाली अक्षयाने सर्वांना 'रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा' असं म्हटलं आहे. दरम्यान या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत पसंती दर्शवली आहे.

Recommended

Loading...
Share