By  
on  

सोनाली खरे निर्मित 'मायलेक' सिनेमाचं लंडनमध्ये शूटिंग सुरू

अभिनेत्री सोनाली खरे हिने मराठी नाटक, मालिका, सिनेमा आणि काही मराठी वेबसिरीजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मातृदिनानिमित्ताने तिने तिच्या एका मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. सोनालीने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची सुरुवात केली आहे. या प्रॉडक्शन अंतर्गत तिने ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती.

मायलेक या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच लंडनमध्ये सुरुवात झाली असून या शूटिंगचे काही खास फोटो सोनालीने सोशल मीडियावर शेयर केले आहेत. विशेष म्हणजे ‘मायलेक’ चित्रपटाद्वारे सोनालीची मुलगी सुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सोनाली आणि सनाया या मायलेकींचीच जोडी मुख्य भूमिकेत दिसणार असून सनाया आनंद ही सोनालीची मुलगी मायलेक चित्रपटात तिच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. आई-मुलीचं सुंदर नातं दाखवण्याचा प्रयत्न सोनाली या चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहे.

त्याचबरोबर या सिनेमात अभिनेते उमेश कामत आणि संजय मोने हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असलेले पाहायला मिळत आहे. प्रियांका तन्वर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. दरम्यान येत्या वर्षभरात हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive