"आवडेल मला तुझ्याशी लग्न करायला" ; बस बाई बसच्या मंचावर पूजा सावंतने दिली आपल्या प्रेमाची कबुली

By  
on  

अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकताच पूजा सावंतचा 'दगडी चाळ २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाच्या निमित्ताने पूजा सावंत हे नाव चर्चेत आहे. दरम्यान आणखी एका कारणामुळे पूजा चर्चेत आली आहे. 

pooja sawant has crush on bollywood actor siddhardh malhotra bus bai bus show

पूजा सावंतने नुकतीच सुबोध भावेचा लोकप्रिय शो 'बस बाई बस या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतानाच तिच्या क्रशबद्दलही सांगितलं. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा पूजाला खूप आवडतो आणि त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा असल्याचं तिनं या कार्यक्रमात सांगितलं तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

या कार्यक्रमात अभिनेत्याचे फोटो दाखवून त्यांच्याबद्दल काय वाटतं हे सांगण्याचा एक सेगमेंट होता. यावेळी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो समोर आल्यावर पूजा लाजत म्हणाली, "माझा तुझ्यावर खूप मोठा क्रश आहे. सिद्धार्थ तू मला खूप आवडतोस आणि आवडेल मला जर तुझ्याशी माझं लग्न झालं तर…". पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट कमेंट केल्या आहेत.

Recommended

Loading...
Share