ललित प्रभाकरचा नवीन सिनेमा ; येत्या नोव्हेंबरला 'सनी' प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

अभिनेता ललित प्रभाकरने आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ललित सोशल मीडियावर देखील तितकाच सक्रिय असतो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @lalit.prabhakar

क्रेझी फ्यु फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता ललित प्रभाकर यात 'सनी'ची मध्यवर्ती भूमिका साकारत असून ह्या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. तर अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस आणि उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित हे देखीक या सिनेमाचे सह-निर्माते आहेत. त्याचबरोबर या सिनेमाचं लेखन इरावती कर्णिक यांनी केलेले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @lalit.prabhakar

दरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 'झिम्मा' प्रदर्शित झाला होता आणि या सिनेमाने लोकांना वेड लावले होते तर या वर्षी पुन्हा त्याच शुक्रवारी ‘सनी' हा सिनेमा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 'झिम्मा' या सुपरहिट ठरलेल्या सिनेमानंतर हेमंत ढोमे 'सनी' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share