माधुरी दीक्षितने केले गश्मीर महाजनीची कौतुक, पाहा Video

By  
on  

मराठीतला हॅंण्डसम हंक अभिनेता गश्मिर महाजनी सध्या बराच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरच्या डान्सच्या स्पर्धेत एकात तो परिक्षक आहे तर एकामध्ये चक्क स्पर्धक म्हमून सहभागी झाला आहे. सध्या ‘झलक दिखला जा’च्या १०व्या सीझनमध्ये गश्मीर महाजनी स्पर्धक म्हणून सहभागी झालेला पाहायला मिळत आहे. त्याच्या नृत्याचे प्रेक्षकांकडून ‌कौतुक नेहमीच होत आले आहे. पण आता धकधक गर्ल माधुरी दीक्षितकडूनही गश्मीरवर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

गश्मीरने आयुष्यात खूप लहान वयात आर्थिक अडचणी अनुभवल्या आणि त्यामुळेच अभिनय व डान्स ही त्याची आवड नव्हे तर गरज झाली. त्याचा झलकच्या नुकत्याच झालेल्या एका परफॉर्मन्सचा व्हिडीओ व माधुरीने त्याला दिलेली मनापासून दाद सध्या व्हायरल होतेय. 

अभिनयासोबत एक जोड व्यवसाय असावा म्हणून रवींद्र महाजनी यांनी बांधकाम व्यवसायात भागीदारी केली आणि तिथे त्यांची फसवणूक झाली. त्यांचं पुण्यातील राहतं घरं जप्त करण्यात आलं. त्यांच्यावर असलेल्या कर्जाचा डोंगरही वाढला. गश्मीरच्या आईवर जेमतेम पगाराची नोकरी करण्याची वेळ आली. तेव्हा गश्मीर फक्त पंधरा वर्षाचा होता. त्यामुळे आवड म्हणून जपलेल्या नृत्याला व्यवसाय बनवण्याचा निर्णय गश्मीरने घेतला आणि त्याने अकरावीत असतानाच नृत्याचे धडे द्यायला सुरूवात केली. तसेच नाटकांमध्ये मिळेल ती भूमिका करून आर्थिक गरज भागवली. गश्मीर महाजनी वयाच्या १५ व्या वर्षापासून डान्स अकादमी चालवत आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

हा संपूर्ण संघर्ष त्याने नृत्याच्या माध्यमातून उलगडला. तो पाहताना तिथे उपस्थित असलेल्या त्याच्या आईच्या डोळ्यातूनही पाणी आलं. नंतर स्टेजवर येऊन आई म्हणाली, “हा नसता तर आम्ही नसतो.” त्यानंतर माधुरी दीक्षितनेही त्याचं खूप कौतुक केलं. ती म्हणाली, “गश्मीर, तू तुझ्या आयुष्याचा सुलतान आहेस.”

Recommended

Loading...
Share