'पावनखिंड'चे कलाकार आले एकत्र, हे आहे कारण

By  
on  

पावनखिंड या सुपरहिट ऐतिहासिक सिनेमाने महाराष्ट्रासह सर्वच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पावनखिंड या ऐतिहासिक सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मयने आपली छाप पाडलीय. तसंच अलीकडेच तो गाजलेल्या 'द कश्मीर फाइल्स' या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात त्याने रंगवलेला बिट्टा कराटे हा खलनायक बराच गाजला. आता तो पुन्हा  एक नवी कोरी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.

चिन्मय मांडलेकरने  नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. 'केस नंबर 99' हे चिन्मयच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे. हा एक थरारक चित्रपट असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चित्रपट त्याच्यासोबत मृण्मयी देशपांडे, अजय पुरकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट निखिल लांजेकर यांनी  दिग्दर्शित केला आहे.

 

 

'केस नंबर 99' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्याची माहिती चिन्मयने पोस्टमध्ये दिली आहे. शूट संपल्याचे काही फोटो शेअर करत त्याने लिहिलंय कि, 'या एका शब्दात शेवट ही आहे अन् सुरूवात ही. WRAP.'  

'पावनखिंड'ची ही टीम ऐतिहासिक सिनेमांशिवाय एक वेगळा सस्पेन्स-थ्रिलर घेऊन येत असल्याने चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share