श्रेयस तळपदेच्या "बेबीफेस"ची सोशल मीडियावर चर्चा!!

By  
on  

"आपडी थापडी" या चित्रपटातून मराठी चित्रपटात पुनरागमन करणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेच्या बेबीफेसची सोशल मीडियात चर्चा आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने श्रेयसने आपला चेहरा लहान मुलासारखा करत "आपडी थापडी" हे बडबडगीत म्हटलं आहे. "आपडी थापडी" हा चित्रपट ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती iआणि प्रस्तुती असलेल्या 'आपडी थापडी' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. 'फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडणार आहे. 

 

 

याआधी अभिनेत्री मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नवीन प्रभाकर आणि नंदू माधव यांच्याही बेबीफेसला उत्तम प्रतिसाद मिळाला.

Recommended

Loading...
Share