'सैराट २' कधी येणार यावर आर्चीनं दिलं उत्तर

By  
on  

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीतले सगळे विक्रम मोडले आणि दमदार कामगिरी करत महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशातील रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आर्ची-परश्याच्या लव्हस्टोरीने सर्वांनाच वेड लावलं. आजही सैराटची आर्ची आणि परश्या ही रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांची ओळख कायम आहे. सुबोध भावे होस्ट करत असलेल्या महिला स्पेशल बस बाई बस या कार्यक्रमात नुकतीच रिंकूने हजेरी लावलेली. यात तिने इतर महिला प्रवासी व सुबोधच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. 

‘बस बाई बस’ शोमध्ये रिंकूने सगळ्याच प्रश्नांना दिलखुलास आणि मजेशीर पद्धतीने उत्तरे दिली. कार्यक्रमात रिंकूला “’सैराट’ चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे का?”, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत ती म्हणाली, “’सैराट २’ येणार की नाही याबद्दल मला माहीत नाही. शक्यतो नाही”. पुढे ती म्हणाली, “’सैराट’ चित्रपटाचा सिक्वेल येणार की नाही याबद्दल नागराज मंजुळे दादाच सांगू शकतील”.

 

Recommended

Loading...
Share