अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यात शाब्दिक वाद, जाणून घ्या प्रकरण

By  
on  

आजकाल सोशल मिडीया हे सर्वात जास्त प्रभावी माध्यम म्हणून ओळखलं जातं. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण सोशल मिडीयावर पडीक असतात. सोशल मिडीयावर सतत मिश्कील पोस्ट करणारा अमेय वाघ आणि नेहमीच ज्वलंत विषयांवर आपलं मत देणारा अभिनेता सुमित राघवन यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहे, तोसुध्दा सोशल मिडीयावर. 

अमेय वाघने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतेय. 'जंगलात राघू सुमीत राघवन खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो... याची कृपया नोंद घ्यावी'. अमेयच्या या पोस्टने सगळ्यांनाच गोंधळात टाकलं आहे. यावर सुमीत राघवननेही एक पोस्ट लिहीत त्याला सडेतोड उत्तर दिलंय. 

'सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय.. कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ हॉट नाही याचीही कृपया नोंद घ्यावी', सुमीतने अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे आता दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. मात्र हा वाद नक्की कशामुळे झालाय?, नक्की काय प्रकरण आहे, असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. त्यामुळे दोघांच्याही पोस्टनं सगळीकडे गोंधळ उडवला आहे.

नेमकं हे भांडण आहे, की आगामी मालिका सिनेमाचं प्रमोशन ह्याचा विचार नेटकरी करतायत. तर अनेकांनी हा प्रमोशनसाठीचा फंडा जुना झाल्याचं म्हटलंय. 

Recommended

Loading...
Share