अभिनेत्री अमृता सुभाष नाही तर जया आहे प्रेग्नेंट , पाहा Video

By  
on  

मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी प्रतिभावान अभिनेत्री अमृता सुभाष हिने आज सकाळी सोशल मिडीयावर एक पोस्ट करत चाहत्यांसह सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. वयाच्या 43व्या वर्षी अमृतानं तिच्या आयुष्यात मोठा निर्णय घेतलाय. अमृतानं प्रेग्नंसी टेस्टचा पॉझिटिव्ह रिपोर्ट सर्वांबरोबर शेअर केला . अमृता प्रेग्नंट असल्याचं समोर आलं आणि सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. 

ओह... द वंडर बिगन असं कॅप्शन देत अमृतानं प्रेग्नंसी टेस्टचा पॉझिटिव्ह रिपोर्ट शेअर केलाय. त्याचप्रमाणे बाळाचं लाणेरंचा फोटो देखील तिनं शेअर केला आहे. अमृताच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. 

 

अमृताच नाही तर दुसरीकडे अभिनेत्री नित्या मेननन देखील सेम पोस्ट शेअर केली आहे. तसंच तिच्या पोस्टचं कॅप्शनही 'ओह... द वंडर बिगन' असंच आहे. नित्याची पोस्ट पाहून ती देखील प्रेग्नंट असल्याचं सर्वांना वाटत आहे. तिलाही अनेकांनी शुभेच्छा दिल्यात. दोघींची पोस्ट पाहता हे नव्या सिनेमा किंवा वेब सीरिजचं प्रमोशन असल्याचं स्पष्ट कळतंय..

आणि काही वेळापूर्वीच अमृताने आपल्या आगामी सिनेमासाठी ही  पोस्ट असल्याचं एका हटके व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे. अमृता म्हणते, मी नाही तर जया प्रेग्नेंट आहे. जया हे तिच्या हिंदी सिनेमातील व्यक्तिरेखेचं नाव आहे. वंडर वुमन असं या सिनेमाचं नाव आहे.  सोनी लिव्हवर हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. अमृताचा खरा नवरा अभिनेता संदेश कुलकर्णीच यात अमृताच्या पतीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

 

 

सर्वांनाच आता अमृता सुभाषच्या या नव्या वंडर वुमन सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे.  

Recommended

Loading...
Share