‘व्हिक्टोरिया’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

निर्माता आनंद पंडित, रूपा पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘व्हिक्टोरिया’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका असलेल्या 'व्हिक्टोरिया' या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग स्कॉटलंड मध्ये झालेले आहे . हीरा सोहल ही अभिनेत्री या सिनेमाद्वारे पदार्पण करत आहे . अभिनेता विराजस कुलकर्णी हा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. विराजस आणि जीत अशोक यांनी मिळून या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. काही महिन्यापूर्वी व्हिक्टोरिया चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लुक समोर आला होता. त्यानंतर आता सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 

 या चित्रपटाच्या टीमने ‘व्हिक्टोरिया’चे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे.यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. तसेच अभिनेता  पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णी सह हा तिसरा चित्रपट आहे , या पूर्वी ती आणि ती , तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत .

 

 

. ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट येत्या १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग तसेच आशय कुलकर्णी हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share