राणादा आणि पाठकबाईंच्या रिअल लाईफ लग्नाला उरले फक्त सहा दिवस

By  
on  

छोट्या पडद्यावरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक गाठले.तीन-चार वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. शेतकरी नायक व शिक्षीका असलेली नायिका यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. हेच  राणादा आणि पाठक बाईं ख-या आयुष्यातही प्रेमात पडले.  त्यांची रिअल लाईफ लव्हस्टोरी सुरु असल्याचं त्यांनीच जाहीर केलं. काही महिन्यांपूर्वीच दोघांचा मोठ्या थाटात साखरपुडा संपन्न झाला होता. तेव्हापासूनच चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले.

 दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता हार्दिक जोशीच्या केळवणाचा फोटो समोर आला आहे. या फोटोतून लग्नाच्या तारखेबद्दल खुलासा झाला आहे.


गेल्या काही दिवसांपासून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या केळवणाचे आणि बॅचलर पार्टीचे फोटो समोर आले होते. त्यानंतर हल्लीच अक्षया देवधरचा नववधूच्या वेशातील एक व्हिडीओ देखील समोर आला होता. त्यानंतर अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट करत कधी लग्न करताय? असा प्रश्न विचारला होता. पण नुकतंच हार्दिक जोशीच्या एका मैत्रिणीने पोस्ट केलेल्या फोटोमुळे त्या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

 

 

हार्दिक जोशी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. हार्दिकने नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला त्याने ‘घरचं केळवण’ असे कॅप्शन दिले आहे. यात तो छान पारंपारिक वेशात दिसत आहे. तर त्याच्या समोर छान पंचपक्वानांनी भरलेले ताट पाहायला मिळत आहे. त्या ताटाभोवती छान सजावट केली असून रांगोळीही काढल्याचे पाहायला मिळत आहे.

Recommended

Loading...
Share