कुणीतरी येणार येणार गं...नेहा धुपियाकडे आहे, गोड बातमी?

By  
on  

घरात नवीन पाहुणा येणर म्हटलं, की सगळीकडे आनंदाला उधाण येतं. आई होण्यासाठी सज्ज झालेल्या स्त्रीचे कौडकौतुकही प्रचंड होतात. मग यात, सेलिब्रिटींच्या घरी जर अशा पाहुण्याचे आगमन होणार असेल, तर मग काय पाहायलाच नको....कौतुकांचा फक्त वर्षाव. बी टाउनमध्ये जर कुठे गोड बातमी असेल, तर प्रसिध्दी माध्यमांच्या निशाण्यावर ते सेलिब्रिटी असतात. करिना कपूर खान आणि सोहा अली खान या दोघींना मातृत्वसुख लाभल्यानंतर आता लवकरच बी-टाउनच्या आणखी एका अभिनेत्रीकडे गोड बातमीची चाहूल लागल्याची कुणकुण ऐकू येतेय.

बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री नेहा धुपिया लवकरच काजोलसह ‘हेलिकॉप्टर इला’ सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. परंतु या सिनेमातील तिच्या भूमिकेपेक्षा एक वेगळीच चर्चा रंगलीय ती म्हणजे ती लवकरच गोड बातमी देणार आहे, ही पण सूत्रांच्या माहितीनुसार अजुन तरी कुठलीही अधिकृत माहिती याबाबत जाहीर झालेली नाही. नेहाने यावर्षी मेमध्ये सहअभिनेता अंगद बेदीसोबत लग्न केलं होतं. दरम्यान ‘सूरमा’ सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये अंगदला प्रसिध्दी माध्यमांनी याबाबत प्रश्न केला असता, त्यांनी तो फेटाळून लावला.

डीएनएच्या वृत्तानुसार, त्यांनी याबाबत नेहाला विचारणा केली, पण तिच्याकडून कुठलेही उत्तर आले नाही. आत्ता...खरं काय आहे, ते येणारा काळ ठरवेलच. त्यामुळे सर्वांच्या उत्सुकतेवर लवकरच उत्तर मिळणार आहे.

 

Recommended

Share