By  
on  

बोल्ड अंदाजात 'टकाटक' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

हिंदी सिनेसृष्टीप्रमाणे मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये सध्या बोल्ड सिनेमांचा एक प्रवाह आलेला दिसून येतो. अलीकडेच प्रदर्शित झालेला 'शिकारी' हा सिनेमा त्याच्या बोल्ड अंदाजामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता. मिलिंद कवडे दिग्दर्शित आगामी 'टकाटक' हा सिनेमा सुद्धा याच विषयाकडे झुकणारा आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून हा सिनेमा प्रेक्षकांचं बोल्ड मनोरंजन करेल यात शंका नाही.

'टकाटक' सिनेमात प्रथमेश परब, अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, रितिका श्रोत्री या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'पर्पल बुल एंटरटेनमेंट', 'गाववाला क्रीएशन' आणि 'व्ही. पत्की फिल्म्स' यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. मिलिंद कवडे दिग्दर्शित 'टकाटक' सिनेमा २८ जुन रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive