By  
on  

मुलांचा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी आप्पा बनेंची नवी शक्कल

उन्हाळा म्हटलं की मोठे लोक नाक मुरडतात. पण मुलांसाठी मात्र उन्हाळ्यात पर्वणी असते. वार्षिक परिक्षा संपली की सगळ्यात मोठी सुट्टी मुलांना मिळते. संपुर्ण सुट्टीभर मुलं हवं ते करायला मुक्त असतात. पण असं असलं तरी प्रत्येकालाच उन्हाळा आवडतो असं नाही. बने कुटुंबातील बच्चे कंपनी मात्र उन्हाळ्यात फारशी खुष दिसत नाही. त्यामुळे बने अजोबा मुलांचा सुसह्य करण्याची नवी शक्कल लढवतात. ही शक्क्ल काय आहे ते नव्या भागात समजेलच.

https://twitter.com/sonymarathitv/status/1129636604492967936

सोनी मराठीवरील ‘ह. म. बने तू. म. बने’ मालिकांमध्ये सतत घरगुती गमतीजमती चालू असतात त्याचबरोबर मालिकेमध्ये दैनंदिन जीवनातले महत्वाचे विषयही हाताळले जातात. मालिकेतील प्रत्येक भाग हा मनोरंजनासोबतच नकळत एक संदेश देऊन जातो. ‘ह.म.बने तु.म.बने’च्या या अस्सलपणा मुळेच ती प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive