By  
on  

अभिनेत्री राधा सागर बनवणार आंबट गोड 'लोणचं'

मराठी सिनेमातली लोकप्रिय अभिनेत्री राधा सागर संजय लीला भन्साळी निर्मित आणि मंगेश हाडवळे दिग्दर्शित 'मलाल' या हिंदी सिनेमात सिनेमात काम करणार असल्याची जोरदार चर्चा सिनेविश्वात रंगत आहे. यानंतर राधा 'लोणचं' या आगामी मराठी सिनेमात काम करणार आहे. आपल्या इंस्टाग्रामवरून राधाने या हटके नाव असलेल्या मराठी सिनेमाची माहिती चाहत्यांना दिली.

'आयसिन्क प्रोडक्शन' निर्मित 'लोणचं' या सिनेमाचा पहिला क्लॅप देतानाचा फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केला. या सिनेमाबद्दल आणखी महिती अद्याप कळू शकली नाही. तरीही राधाने ही पोस्ट टाकून चाहत्यांच्या मनात या आगामी सिनेमाबद्दल कुतूहल निर्माण केलं आहे.

https://www.instagram.com/p/BxyfcQUJSfp/

राधाने याआधी मराठी नाटक तसेच मालिकांमधून स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अलीकडेच राधा 'स्ट्रगलर साला' या वेबसिरीजमध्ये सुद्धा झळकली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive