By  
on  

कुशलच्या आनंदात श्रेया सहकुटुंब सहभागी, हे आहे कारण

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या कार्यक्रमात आजपर्यंत अनेक मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत वावरणाऱ्या तारेतारकांनी उपस्थिती दर्शवली आहे. या कार्यक्रमातील निखळ विनोद प्रेक्षकांची गेली ३-४ वर्ष करमणूक करत आहेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यात त्यामधील कलाकारांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे.

गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आणि 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामधील सर्वांचा लाडकाहास्यवीर कुशल बद्रिके याने नुकतंच स्वतःचं घर घेतलं आहे. त्यानिमित्ताने कुशलचं अभिनंदन करण्यासाठी त्याची सहकलाकार आणि मैत्रीण श्रेया बुगडे सहकुटुंब कुशलच्या नवीन घराला भेटायला गेली. यावेळी तिचे आई-वडील आणि पती निखील शेठसुध्दा खास उपस्थित होते.

श्रेयाने नुकत्याच आपल्या इंस्टाग्रामवरून कुशलविषयीची ही खुशखबर सांगितली. या आनंदाच्या प्रसंगी श्रेया पती आणि तिच्या आई बाबांसोबत कुशलला भेटायला गेली होती. या प्रसंगी कुशलसुद्धा आपल्या बायको आणि मुलासोबत आनंदात दिसत होता.

Recommended

PeepingMoon Exclusive