सुबोध भावेच्या नाटकादरम्यान आगीची घटना, फेसबूकद्वारे दिली माहीती

By  
on  

रंगमंचावरवर नाटक साकारताना कलाकारांचा जितका कस लागतो. त्यामागे मेहन पडद्यामागच्या कलाकारांचीही असते. कपडेपट, नाटकाचा सेट सांभाळताना अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. सुबोध भावे यांच्या ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकाच्या रवींद्र नाट्यमंदीर मुंबई येथील शोदरम्यान आगीची दुर्घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. पण प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कालचा शो मात्र रद्द करण्यात आल. सुबोधने फेसबूक लाईव्ह करत घटनेची माहीती चाहत्यांना दिलीच. याशिवाय काल शो न पाहू शकल्यामुळे निराशा झालेल्या प्रेक्षकांची माफीही मागितली. यावेळी त्याच्यासोबत उमेश जगताप आणि शैलेश दातार देखील उपस्थित होते.

https://www.facebook.com/subodhbhaveofficial/videos/411318526385005/?__xts__[0]=68.ARDsNvV3A9jIGDx8OxpABiqHUBRDZVk1JWm5WX6i8AM6e8a3Z7Wfq4CtpyDuzec-J08rSvP9_bXH2K9Rpr-JfDa3JcRUDUjpNSm_XUqGp5jvuMC7wvx7lNUuf-303lH5KlSsOeVMPkzuR2sqFMciZIS1OWRAAq00-0I8opr7fjueqnSlpDH9syLMY93oVJ9ZlTcrLW6gPe3vFm57vWl7FUNW1FgVspE-JTx39HmoVo8-ahtoSpRzJXX-b80SUAaSFFofw_0OMCSg5MiaVMd9Nq4ZyC6hI-lyerI4i0KuJI15ql_KtILTWpuLr3nd_Tj14O-EA_cQEiiLyevfyqCkbCc4Zx4JXYiE3LE&__tn__=-R

प्रा. वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे गाजलेलं नाटक सुबोध पुन्हा रंगभूमीवर घेऊन आला आहे. प्रसिध्द दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतायत. या नाटकाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल सुबोधने लाईव्ह दरम्यान आभार मानले आहेत. ‘या नाटकामुळे कधीही नाटक ना पाहिलेल्या व्यक्तीही नाटकाकडे वळत आहेत. याचा आनंद जास्त असल्याचं सुबोधने म्हटलं आहे.

Recommended

Loading...
Share