'बिग बॉस मराठी 2' मध्ये रुपाली भोसले सदस्यांसाठी बनली मेकअप आर्टिस्ट्

By  
on  

'बिग बॉस मराठी 2' सुरु होऊन काही दिवस झाले असतानाच यामध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकांचे स्वभाव हळूहळू प्रेक्षकांना कळू लागले आहेत. पहिल्या आठ्वड्यासाठी शिव ठाकरेवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. तसेच अभिजीत बिचुकले आणि वैशाली माडे हे दोघं कॅप्टन झाले असून या दोन कॅप्टनच्या अंतर्गत स्पर्धकांची विभागणी करण्यातआली आहे.

नॉमिनेशन आणि टास्क या गोष्टीमधून वेळात वेळ काढून रुपाली भोसलेने मात्र स्वतःमधलं सौन्दर्यप्रसाधनाचे कौशल्य दाखवून दिलं आहे. रुपालीने स्वतःसोबत दिगंबर नाईक यांच्या चेहऱ्यावर क्रीम लावून स्वतःमधलं सौन्दर्यप्रसाधनाचं अनोखं कौशल्य बिग बॉसच्या घरात दाखवलं आहे.

प्रचंड गरमीमध्ये चेहरा नीट राहावा म्हणून बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी अनेक स्पर्धकांनी स्वतःच्या चेहऱ्यावर क्रीम लावली होती. पहिल्या सिजनप्रमाणे सध्या सुरु असलेला दुसरा सीजनसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या खेळात अजून कोणती रंगत येणार, हे येत्या काही दिवसांमध्ये कळून येईल.

Recommended

Loading...
Share