By  
on  

'बिग बॉस मराठी 2'च्या घरात अशी रंगली बनवाबनवी

'बिग बॉस मराठी 2'च्या घरामध्ये सध्या नॉमिनेशनचे टास्क, वाद – विवाद, भांडण, मतभेद, मैत्री अशा गोष्टी दिसून येत आहेत. या सगळ्यामध्ये बिग बॉसने सदस्यांसाठी खूपच वेगवेगळे टास्क दिले आहेत.

सदस्यांमध्ये सध्या 'सवाल ऐरणीचा' हा टास्क रंगत आहे. सुरेखा पुणेकर–विद्याधर जोशी, किशोरी शहाणे–अभिजित केळकर यांच्यामध्ये सवाल ऐरणीचा हा टास्क रंगणार आहे. ज्यामध्ये या चौघांना 'बिग बॉस' एक अनोखं आव्हानं देणार आहेत. बिग बॉस नेहेमीच सदस्यांना नवनवीन टास्क देतात. यावेळेस देखील बिग बॉसने दिलेलं आव्हान तितकच वेगळ आणि कठीण असणार आहे.

 

विद्याधर जोशींना सुरेखा पुणेकर यांच्या वेशात तर सुरेखा पुणेकर यांनी विद्याधर जोशी यांच्या वेशात घरात वावरायचे आहे.  हाच नियम किशोरी शहाणे–अभिजित केळकर यांना देखील लागू पडणार आहे. याच बरोबर दिलेल्या गाण्यावर नृत्य देखील सादर करायचे आहे.

हाच टास्क पूर्ण करण्यासाठी विद्याधर जोशी यांनी नऊवारी साडी नेसली असून सुरेखा ताई विद्याधर यांना 'या रावजी' ही लावणी शिकवणार आहे. तर किशोरी शहाणे अभिजित केळकरला 'अशीही बनवाबनवी' या चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य शिकवणार आहेत. अभिजित केळकर मुलीच्या लुक मध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या टास्कमुळे घरातील वातावरण थोडं हलकफुलकं झालं ३आहे यात शंका नाही.

या आगळ्यावेगळ्या टास्कची गम्मत प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. या अनोख्या टास्कमुळे 'बिग बॉस मराठी 2' ची रंगात नक्कीच वाढेल.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive