By  
on  

रितेश देशमुखच्या तक्रारीवर हैदराबाद एअरपोर्ट सिक्युरिटीने दिलं हे उत्तर

रितेश देशमुख सोशल मिडियावर भलताच अ‍ॅक्टीव्ह असतो. अलीकडे त्याने हैदराबाद एअरपोर्टवरील एक व्हिडियो शेअर केला आहे. या विमानतळावरील गलथान कारभाराचा एक व्हिडियो शेअर केला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचंही रितेशने सांगितलं आहे. रितेशने ट्वीटरवर दोन व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये एअरपोर्ट लाउंज येथील आपतकालीन दरवाजा बंद आहे. आत आणि बाहेर जाण्यासाठी फक्त एलिवेटरचाच पर्याय उपलब्ध आहे. पण तांत्रिक बिघाडामुळे एलिवेटरही बंद होतं. असं ट्वीट करत रितेशने या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं केलं.

https://twitter.com/Riteishd/status/1132979919951147008

दुस-या व्हिडियोमध्ये रितेश म्हणतो,‘ प्रवाशांचे विमान चुकले तरी चालेल पण सुरक्षा कर्मचा-याने  काही केल्या दरवाजा उघडला नाही. हैदराबाद विमानतळ प्रशासनाने हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, पब्लिक एक्झिट  अशाप्रकारे बंद करता येत नाही,’ असे त्याने लिहिले आहे. यावर हैदराबाद एअरपोर्ट व्यवस्थापनाने उत्तर देताना ट्वीट मध्ये म्हटलं आहे की, एका तांत्रिक अडचणींसाठी दरवाजा बंद करण्यात आला होता. पण काही काळाने तो उघडला गेला. प्रवाशांची सुरक्षा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे.’ असं या ट्वीट केलं आहे.

https://twitter.com/Riteishd/status/1132997066869878785

Recommended

PeepingMoon Exclusive