'बिग बॉस मराठी 2' च्या घरात विद्याधर जोशी यांनी व्यक्त केली ही खंत

By  
on  

बिग बॉसच्या घरात अवघे दोन दिवस झालेत आणि आतापासूनच या घरातले स्पर्धक मजेशीररित्या एकमेकांशी जुळवून घेत आहेत. अशाच एका निवांतवेळी सर्वजण गप्पा मारत असताना विद्याधर जोशी काहीसे गोंधळलेले होते. त्यांनी तरुण स्पर्धकांना त्यांनी विचारले की, ''वेब सीरिजमध्ये लोकांना काम नेमकं कसं मिळतं?'' यावर शिवानीने त्यांना चिडवत म्हटले, "ते पण टेकओव्हर करायचं आहे का?" त्यावर विद्याधर यांनी चटकन जवाब दिला, "मी इथे आलोय म्हणजे माझ्याकडे काम नाही, हे सिद्ध होतं की नाही!" बिग बॉसच्या घरात येण्यापुर्वी विद्याधर यांनी पुढील सिनेमे व मालिका साईन केल्या असतील

या सगळ्या गंमतीत दिगंबर नाईक व इतरही सामील झाले आणि बिग बॉसच्या घरात येण्यापुर्वी विद्याधर यांनी पुढील सिनेमे व मालिका साईन केल्या असतील असं ते म्हणाले. यावर विद्याधर म्हणाले, "मला जर ते तीन महिने अॅडजस्ट करायला तयार असतील तर तो रोल किती थुकरट असेल!"

मात्र खरा आश्चर्याचा धक्का नंतर होता, जेव्हा शिवानी बाप्पा गोखले यांना उद्देशून म्हणाली,"बाप्पा सेट वरच येतो तर माझ्याकडे ४ तासच आहेत लवकर काय ते करून घ्या''हे वाक्य ऐकल्यानंतर विद्याधर यांनी आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी एक किस्सा सांगितला आणि म्हणाले, "तुम्हाला माहितीय का, यावरून माझी खूप बदनामी झाली आहे..." ते पुढे म्हणाले, "मी नाव नाही घेत पण आपल्यामधील एक प्रोड्युसर आहे, तीने माझयासमोर माझी कंप्लेंट केली की बाप्पा शूटिंगसाठी पुरेसा वेळ देत नाही" अशाप्रकारे बाप्पानी आपली खंत सर्वांसमोर व्यक्त करून आपली बाजू मोकळेपणाने सर्वांना सांगितली. 'बिग बॉस मराठी 2' ला सुरुवात झाली असून यापुढे या स्पर्धेत कशी रंगात येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बिग बॉस मधील असेच न पाहिलेले प्रसंग तुम्हाला VOOT अॅप वर पाहायला मिळतील.

Recommended

Loading...
Share