By  
on  

‘बिग बॉसमध्ये आजचा दिवस होता ‘कभी खुषी, कभी गम’, वाचा काय घडलं असं

‘बिग बॉस मराठी २’ च्या घरात आता बाँडिंग चांगलंच रंगू लागलं आहे. याशिवाय घरातील सदस्यांमध्ये टीम स्पिरीटची भावनाही जागू लागली आहे. आज एका टास्क दरम्यान अभिजीत केळकरला वीणाला नॉमिनेशन पासून वाचवण्यासाठी कुटुंबाच्या फोटोग्राफला नष्ट करावं लागलं. तर मैथिली जावकरला वाचवण्यासाठी रुपालीला तिच्या सगळ्यात आवडत्या टेडीचा त्याग करावा लागला. यादरम्यान रुपाली आणि अभिजीत कमालीचे भावनिक झाले होते.

आजच्या दिवसातील दुसरं टास्क होतं ते अदला-बदलीचं. यात अभिजीत आणि किशोरीने अशीही बनवा बनवी या गाण्यावर नृत्य केलं. तर सुरेखा पुणेकर आणि विद्याधर जोशी यांनी फक्कड लावणी सादर केली. त्यंनी हे टास्क यशस्वीरित्या पुर्ण केल्याने ते नॉमिनेशनपासून वाचले आहेत. आज पुन्हा एकदा स्वयंपाकघराचं सदस्यांमुळे कुरुक्षेत्र बनलं होतं आणि रडारवर होते शेफ पराग कान्हेरे. या घरात उद्या मात्र काय वाढून ठेवलं आहे आणि कठीण टास्कची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे आम्ही तुम्हाला सांगूच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive