By  
on  

म्हणून 'बिग बॉस मराठी 2' च्या घरात अभिजीत बिचुकले यांना आलं गहिवरून

'बिग बॉस मराठी 2' ची चर्चा सगळीकडे रंगत आहे. आरोप-प्रत्यारोप, कुरघोडी, बाचाबाची यांमुळे 'बिग बॉस मराठी 2' ची रंगत उत्तरोत्तर वाढत आहे. बिग बॉसचे आतापर्यंत ४ दिवस पूर्ण झाले असून या ४ दिवसात यातील सहभागी स्पर्धकांचे स्वभाव हळूहळू बाहेर येत आहेत.

या सीजनमध्ये नेता अभिजीत बिचुकले आपल्या वेगळ्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. महिलांवरील टोमणे, शेरेबाजी, घरातली काम करण्यास दिलेला नकार यामुळे बिचूकलेंना गेल्या ४ दिवसात इतर सदस्यांकडून रोषाला सामोरे जावे लागते.

बिचूकलेंना हल्लीच रुपाली भोसले आणि नेहा शितोळेकडून बोलणं ऐकावं लागलं. सतत मागे गॉसिप करत असल्याने रुपाली आणि नेहा बिचूकलेंवर रागावल्या आणि त्यांनी बिचुकलेनेंना स्पष्ट शब्दात सुनावलं. या दोघींचं ऐकताना बिचुकले बेडवर शांत बसून होते आणि दोघींचं ऐकत होते. आणि बिचूकलेंना जेव्हा या दोघी सुनावत होत्या तेव्हा शिवानी मागे आनंदात नाचत होती. हे सर्व झाल्यानंतर नेहाने झोपाळ्यावर बसून बिचूकलेंना शांतपणे समजावून सांगितलं.

रात्री निवांत असताना बिचुकले आणि अभिजीत केळकर गप्पा मारत बसलेले. तेव्हा बिचुकलेंनी राजकारणामधील आपली खंत व्यक्त केली. हे सांगताना बिचूकलेंना गहिवरून आलं आणि त्यांना अश्रू अनावर झाले. तेव्हा अभिजीत केळकरने  बिचूकलेंना सावरलं. आता यापुढे 'बिग बॉस मराठी 2' मध्ये अजून कोणता ड्रामा रंगणार आहे, हे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेलच.

Recommended

PeepingMoon Exclusive