By  
on  

'बिग बॉस मराठी 2' मध्ये या स्पर्धकांमध्ये होत आहे गटबाजी

बिग बॉसचा कुठल्याही भाषेमधला सिझन असो या कार्यक्रमातील सदस्य, भांडण याचबरोबर या बिग बॉसच्या घरात बनले जाणारे ग्रुप नेहमीच चर्चेचा विषय असतात.

 बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये सई, पुष्कर आणि मेघा आणि त्यानंतर त्यांच्या ग्रुप मध्ये शर्मिष्ठाची भरती झाली होती. या ग्रुप मध्ये बरीच भांडण, वाद, गैरसमज झाले असले तरीही ते एकत्र होते. खुपवेळेस या चोघांचा ग्रुप तुटता तुटता वाचला होता. याचबरोबर रेशम, सुशांत, राजेश, आस्ताद यांचा ग्रुप देखील बराच चर्चेत राहिला.

आता 'बिग बॉस मराठी 2' मध्ये सुद्धा पहिला ग्रुप तयार होताना दिसणार आहे आणि तो म्हणजे KVR. आता हा KVR ग्रुप नक्की कोणाचा आहे याची उत्सुकता सर्वाना आहे. तर किशोरी शहाणे, विणा जगताप आणि रुपाली भोसले या तिघींचा हा ग्रुप आहे. याच बरोबर या तिघींनी त्यांना गप्पा मारण्यासाठी एक जागा देखील ठरवून ठेवली आहे आणि त्या जागेचं “KVR कट्टा” असे नाव देखील ठेवले आहे. या नावाला किशोरी शहाणे यांनी संमती दिली.

आता या ग्रुप मध्ये अजून कोणाचा समावेश होईल ? या तिघींचा ग्रुप शेवटपर्यंत टिकून राहील का ? हे बघणं यापुढे रंजक असणार आहे.

तसेच मालवणी भाषेत काम केल्याने सर्वांनी दिगंबर नाईक यांना गाऱ्हाणं घालण्याची विनंती केली. दिगंबर यांनी सुद्धा सर्वांच्या विनंतीला मान देऊन झक्कास गाऱ्हाणं घालून सर्वांची फर्माईश पूर्ण केली.

Recommended

PeepingMoon Exclusive