By  
on  

अभिनेता आस्ताद काळेने लिहिली माधव देवचकेसाठी एक भावनिक पोस्ट

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात 'सरस्वती' मालिकेतला ‘राघव’ म्हणजेच मुख्य अभिनेता आस्ताद काळे दिसला तर आता 'बिग बॉस मराठी'च्या दुस-या पर्वात या मालिकेतला राघवचा लहान भाऊ कान्हा म्हणजेच अभिनेता माधव देवचके दिसून येत आहे.

मालिकेत जसे राघव-कान्हाचे एकमेकांवर नितांत प्रेम होते. तसेच खऱ्या आयुष्यात आस्ताद काळेचे ही माधव देवचकेवर खूप प्रेम आहे. आणि हे प्रेम आस्तादने सोशल मीडियावरून नुकतेच दाखवले. आस्तादने त्याचा आणि माधवचा एक फोटो टाकून त्याखाली लिहीले आहे, ''हा असाच आहे...आयुष्यातल्या अनेक गोष्टींची कमाल clarity आहे याला...जीवाला जीव लावतो...म्हणूनच जवळच्या माणसाचं काही चुकलं तर हक्कानी खूप ओरडतोसुद्धा....सगळ्यांचा लाडका कान्हा...आमचा लाडका माध्या,मॅडी....भीड गड्या....''

https://www.instagram.com/p/ByE_HiQJ_el/?igshid=oxzycs2tti7w

आस्ताद काळेला याविषयी विचारल्यावर तो म्हणतो, “मालिकेमुळे  माझे माधवशी आयुष्यभरासाठी ऋणानुबंध जुळले आहेत. तो मला माझ्या सख्या भावासारखा आहे. माधव उत्तम क्रिकेटर असल्याने त्याच्यात स्पोर्टमॅन स्पिरीट आहे. त्यामूळे तो टास्कमध्येही चांगला खेळेल, असा मला विश्वास आहे.”

आस्ताद काळेप्रमाणेच मालिका आणि सिनेसृष्टीतले अनेक कलाकार सध्या माधवला सपोर्ट करत आहेत. आता माधव बिग बॉस मराठी 2 च्या घरात काय कमाल दाखवतो हे येत्या काही दिवसात कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive