By  
on  

'बिग बॉस मराठी 2'चे स्पर्धक अभिजीत बिचुकले नेमके कुठे चुकले?

'बिग बॉस'च्या घरातलं वातवरण काहीसं हलकं फुलकं होतंय असं वाटत असतानाच चौथ्या दिवशी सदस्यांनी घराचं शब्दश: कुरुक्षेत्र केलं. सुरुवातीला मिळून मिसळून वागणारे सदस्य टास्कसाठी गटातटात विभागले गेले आहेत. परंतु बिचुकले मात्र माधव, नेहा आणि मैथिली यांच्यासोबत आदल्या रात्री एक वेगळाच डाव आखत होते. ''शिवानी आणि नेहापैकी कोणाला आत आणायचंय?'' हा प्रश्न बिचूकलेंनी यांच्यासोबत शेयर केला.

सकाळी उठून मात्र घरातलं वातावरण पुन्हा थोडं हलकंफुलकं होतं. शिवानी हातात संत्र घेऊन बिचूकलेंना 'बिचुकले बंदर' या नावाने चिडवत होती. यावरून ''आडनावाने काही बोलू नका'' असं बिचूकलेंनी शिवानीला तंबी दिली. किशोरी शहाणे यांनी शिवानीला असं न करण्याचा सूचक सल्ला दिला.

त्यानंतर बिचूकलेंवर नेहा शितोळेने पुन्हा निशाणा साधला. आणि आदल्या रात्री बिचुकले जे काही बोलले ते तीने घरातल्या इतर सदस्यांना सांगितलं. त्यावरून बिचुकले स्वतःच्या बेडवर जाऊन झोपले. पुढे बिचुकले आदल्या रात्री जे काही बोलले त्याचा जाब विचारण्यासाठी शिवानी, नेहा आणि रुपाली यांनी घरातल्या इतर सदस्यांसोबत बिचूकलेंभोवती घेराव टाकला.

त्यावरून बिचुकले सतत मागे बोलत असल्याने आणि टास्कमध्ये ढवळाढवळ केल्याने  रुपालीने तावातावाने बिचूकलेंचा खरपूस समाचार घेतला. यावेळेस बिचुकले स्वतःची बाजू सावरायचा आटोकाट प्रयत्न करत होते, परंतु रुपाली आणि नेहा मात्र बिचूकलेंना खडे बोल सुनावत होत्या. या सगळ्यात पराग कान्हेरेने बिचूकलेंची बाजू घ्यायचा प्रयत्न केला. परंतु नेहाने त्यांच्यावर सुद्धा आवाज चढवला.

अशाप्रकारे 'बिग बॉस मराठी 2' च्या चौथ्या दिवसात पुन्हा एकदा बिचूकलेंवर सर्वांनी निशाणा साधला. आता या सगळ्या प्रकाराला बिचुकले कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात हे येत्या काही दिवसांमध्ये कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive