By  
on  

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात कोणाला मिळणार पहिला कॅप्टन होण्याचा मान?

बिग बॉस मराठीच्या घरातील चौथा दिवस खूप वादग्रस्त आणि भावूक ठरला. वीणा आणि नेहाला डोक्यावर अपात्र लिहून आणि गळ्यात पाटी लटकवून घरामध्ये वावरण्यास बिग बॉसने सांगितले. तर पराग आणि वैशालीमधील वाद तसेच रुपाली, नेहा आणि अभिजित बिचुकलेमधील वाद खूप टोकापर्यंत गेला. एकीकडे वीणा आणि शिवानीमध्ये बाचाबाची झाली तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात KVR नावाचा ग्रुप तयार झाला.

बिग बॉसच्या घरात आज शुक्रवारचा दिवस जरा हलकाफुलका जाणार आहे. सगळ्या सदस्यांच्या आजच्या दिवसाची सुरुवात नागिन डान्सने होणार आहे. त्याचसोबत KVR ग्रुपची एकता आणि त्यांची इच्छा काय आहे हे बघायला मिळणार आहे. दुसरीकडे बिग बॉसच्या घरात जोपर्यंत लाइट्स बंद होत नाही तोपर्यंत सदस्यांना झोपण्यास सक्त मनाई असते. परंतु आज मात्र बरेच सदस्य या नियमाचे उल्लंघन करताना दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/ByFqEvuJrch/

या सर्व घडामोडींमध्ये सर्वांत उत्सुकतेची बाब म्हणजे ‘बिग बॉस मराठी 2’चा पहिला कॅप्टन कोण होईल हे कळणार आहे. याबाबतची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. अभिजित बिचुकले यांच्या टीममधून नेहा आणि वैशाली म्हाडेच्या टीममधून शिव यांना कॅप्टन्सीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता घरातील सदस्य पहिला कॅप्टन बनण्याचा मान कोणाला देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात यापुढे काय काय होणार याबाबत प्रेक्षकांना कुतूहल आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive