By  
on  

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात पराग कान्हेरेने दर्शवला सुरेखा पुणेकरांना पाठिंबा

'बिग बॉस मराठी'मधील टास्‍क अगदी जोमात आहेत. तसेच असेही वाटते की, स्‍पर्धकांनी गटबाजी करण्‍यास सुरूवात केली आहे. या सीजनच्‍या पहिल्‍या टास्‍कसाठी घरातील सदस्‍यांना दोन टीम्‍समध्‍ये विभागण्‍यात आले. एका टीमचे नेतृत्‍व अभिजीत बिचुकले आणि दुस-या टीमचे नेतृत्‍व वैशाली माडेकडे सोपवण्‍यात आले.

आता पराग कान्‍हेरे व माधव देवचके हे किशोरी शहाणे विज, अभिजीत केळकर, विद्याधर जोशी आणि सुरेखा पुणेकर यांनी सादर केलेल्‍या क्रॉस-ड्रेसिंग टास्‍कबाबत चर्चा करताना दिसत आहेत.
शेफ परागने सुरेखाला मुद्दाम असुविधाजनक कपडे घालायला सांगितलेल्‍या त्‍याच्‍या टीममधील सदस्‍यांबद्दल राग व्यक्त केला.

माधव सुरेखाची बाजू घेतो. तसेच असे करण्‍याची योजना कोणाची होती हे देखील जाणण्‍यासाठी उत्‍सुक असतो. पराग त्‍याची बाजू मांडत म्‍हणतो, ''मला यांच्‍या इज्‍जतीची काळजी आहे. ही लोकं कलावंत आहेत!'' सुरेखा मान्‍य करत प्रतिसाद देते आणि म्‍हणते, ''माझी तर वाटच लागली सगळी.''
यादरम्‍यान पराग पुढे येत म्‍हणतो, ''माझे काही प्रिन्सिपल्‍स आहेत आयुष्‍यामध्‍ये, ती तत्व मी जपली.'' तर बिचुकले या सर्व मतांना मान हलवत होकार दर्शवतो.

यामुळे प्रभावित झालेला माधव परागच्‍या मताची प्रशंसा करतो. ते दोघेही इतर स्‍पर्धकांना (मुलींना) प्रश्‍न विचारायला जातात. पराग म्‍हणतो, ''त्‍या २२-२३ वर्षांच्‍या मुली आहेत, त्‍यांना काय कळणार'' कारण त्‍या सुरेखाताईंची अस्‍वस्‍थता जाण्‍यासाठी असमर्थ आहेत.

स्‍पर्धकांमधील चढाओढ पाचव्या  दिवशीही सुरूच आहे. बिग बॉस मधील अशाच कधीही न पाहिलेल्या गोष्टी  voot अॅपच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

Recommended

PeepingMoon Exclusive