इशाचा रुद्रावतार बघून झेंडे चिंतेत, 'तुला पाहते रे' मालिकेत रंजक वळण

By  
on  

रोमॅंटिक कथानकापासून सुरु झालेल्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेने आता अत्यंत वेगळं वळण घेतलं आहे. इशाला तिचं अस्तित्व म्हणजेच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे समजलं आहे. आता विक्रांतला शिक्षा आणि सरंजामेंना न्याय मिळवून देण्यासाठी तिची धडपड सुरु आहे. अलीकडेच एका घटनेत झेंडेंना राजनंदिनीच्या आवाजातील जरबेचा अनुभव इशाच्या आवाजात आला. इशाच्या थंड स्वरातील धमकीने झेंडेंचा चेहरा पांढरा पडला आहे.

https://twitter.com/zeemarathi/status/1134392636867878913

झेंडे जयदीपच्या कॉफीमध्ये गुपचुप गोळ्या मिसळत असतात. इशाच्या हे लक्षात आल्यावर ती झेंडेंना जाब विचारते. या दरम्यान ती झेंडेंना विलास अशी एकेरी हाक मारते. ती ऐकून झेंडे दचकतात. त्यांना राजनंदिनी बोलल्याचा भास होतो. झेंडे ही बाब विक्रांतला सांगणार का? विक्रांतवर त्याचा काय परिणाम होणार? यामुळे इशाचा जीव तर धोक्यात येणार नाही ना? असे अनेक प्रश्न यावेळी मालिकेच्या चाहत्यांना पडले असतील यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share