By  
on  

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात या दोन उमेदवारांमध्ये रंगणार निवडणूक

पहिल्या सिजनप्रमाणे 'बिग बॉस मराठी' च्या दुसऱ्या सिजनला सुद्धा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळे टास्क, स्पर्धकांचे आपापसातले वाद यामुळे बिग बॉसच्या घरात उत्तरोत्तर रंगत चढत आहे.

बिग बॉसच्या घरात आता कॅप्टनपदाचा एक वेगळा टास्क रंगणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले आणि वैशाली माडे या दोघांमध्ये सध्या सदस्यांची विभागणी करण्यात आली आहे. बिग बॉसनी दिलेल्या आदेशानुसार 'बिग बॉस मराठी 2' च्या घरात आता कॅप्टनपदासाठी पहिला टास्क म्हणजेच निवडणूक होणार आहे.

https://www.instagram.com/p/ByHwQcnB971/

 

या प्रक्रियेमध्ये बिचुकलेच्या टीम मधील नेहा शितोळेला कॅप्टनपदाच्या उमेदवारीसाठी तर वैशाली माडेच्या टीममधून शिव ठाकरेला उमेदवारीसाठी निवडण्यात आला आहे. आता बिचुकले यांना नेहा शितोळेचा प्रवक्ता होऊन तिचा प्रचार करायचा आहे. तर वीणा जगतापला शिव ठाकरेचा प्रचार करायचा आहे.

नेहाने मागील काही दिवसांमध्ये बिचुकलेंवर सतत वादाच्या फैरी झाडल्या आहेत. त्यामुळे अशा स्थितीत बिचुकले नेहाचा प्रचार कसा करतात आणि नेहा आणि शिव या दोघांपैकी ही निवडणूक कोण जिंकणार हे लवकरच प्रेक्षकांना कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive