By  
on  

‘बिग बॉस मराठी 2’ मधील शेफ पराग कान्हेरेने केला आहे हा विक्रम

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये यावेळी स्पर्धकांचं वैविध्य पाहायला मिळत आहे. कोणी लावणीसम्राज्ञी आहे तर कोणी राजकारणी. यातील एक नाव म्हणजे पराग कान्हेरे. व्यावसायिक दृष्ट्या शेफ असलेल्या परागने आपल्या या अनोख्या करियरमध्ये अनेक विक्रम केले आहेत.

 

परागने आपल्या करियरमध्ये 'शेफ एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्' हा किताब मिळवला आहे. तसेच डोळ्याला पट्टी बांधून जेवण बनवण्याची अनोखी कला पराग कान्हेरे यांनी अवगत केली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींमधून परागची स्वयंपाक बनवण्याची विशेष कला प्रत्ययास येते.

मूळचा पुण्याचा असणाऱ्या परागच्या घरची पार्श्वभूमी हि व्यावसायिकांची आहे. पररागने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या 'हॉटेल आणि कॅटरिंग इन्स्टिटयूट' मधून स्वतःचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.

लहानापासून परागला जेवण बनवण्याची आवड होती. याच आवडीचं परागने आपल्या करियरमध्ये रूपांतर केलं.

पराग लोकप्रिय शेफ आहेच शिवाय त्याने टीव्हीच्या माध्यमातून आपली हि कला लोणपर्यंत पोहोचवली. परागने हल्ली समाजमाध्यमावर एका हॉटेलच्या सर्विसचा आणि तेथील जेवणाचा आपल्या पोस्टमधून खरपूस समाचार घेतला. परागच्या या पोस्टची समाजमाध्यमांवर अनेक लोकांनी दखल घेतली.

२००९ पासून पराग टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनल शेफ म्हणून कार्यरत आहे. कूकिंग सोबतच परागला अभिनेता बनण्याची सुद्धा इच्छा आहे.

 

सध्या पराग कान्हेरे बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेला पराग बिग बॉस मराठी 2 मध्ये कशाप्रकारे टिकून राहणार आणि कोणती शक्कल लढवणार हे येत्या काही दिवसांमध्ये कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive