By  
on  

'बिग बॉस मराठी 2' मध्ये शिवानी असा देतेय परागला त्रास

'बिग बॉस मराठी' च्या पाचव्या दिवशी वैशाली आणि बिचुकले यांच्या टीम मधून पहिला कॅप्टन निवडला जाणार आहे. यावेळी वैशालीच्या टीममधून सर्वानुमते शिवचं नाव निवडण्यात आलं आहे. बिचुकले यांच्या टीममधून नेहाचं नाव उमेदवारासाठी निवडण्यात आलं आहे. परंतु बिचुकले मात्र नेहाच्या निवडीसाठी असहमत होते. यावेळेस सुरेखाताईंनी मिश्किल पद्धतीने बिचूकलेंना दम दिला.

पलीकडच्या टीममध्ये काय चाललं आहे हे पाहण्यासाठी शिवानी, वैशाली आणि पराग हे बिचूकलेंच्या टीमजवळ आले. त्यावेळेस परागने अचानक विरुद्ध टीमसमोर त्यांच्या टीमने शिवला उमेदवारासाठी निवडलं आहे हे सांगून टाकलं. परागचं हे वागणं शिवानी आणि वैशालीला आवडलं नाही.

या दोघींनी त्यांच्या टीमसमोर परागचं हे वागणं सांगितलं. सर्वांना परागचं हे वागणं खटकलं असल्याने वैशाली, शिवानी या दोघी परागवर चिडल्या. यावेळेस अभिजीत केळकर आणि बाप्पा जोशी हे गप्प होती. आपली बाजू सावरीच्या ऐवजी हे दोघं गप्पा आहेत हे पाहून परागला त्यांचा राग आला.आणि या रागाच्या भरात त्याने अभिजीतच्या व्ययक्तिक आयुष्यावर बोट ठेवलं.

पराग अभिजीतच्या व्ययक्तिक आयुष्यावर बोट ठेवत असल्याने शिवानी परागवर चिडली आणि तिनेसुद्धा परागच्या व्ययक्तिक आयुष्याबद्दल त्याला टोमणे मारले. एकंदर समोरच्या टीमसमोर उमेदवाराचं नाव फोडल्याने परागला त्याच्या टीमच्या सदस्यांचा रोष पत्करावा लागला.

यानंतर शिवानी बाथरूमच्या इथे कॅमेरात बोलत असताना पराग तिथे आला आणि शिवणीने पाय पुढे टाकून परागला पाडायचा प्रयत्न केला. त्यानंतर पराग तोंडावर पाणी मारत असताना शिवानीने सुद्धा त्याच्यावर पाण्याचे फवारे उडवून त्याला भिजवलं. या सर्व प्रकारात पराग मुकाट्याने सर्व सहन करत होता.

अशाप्रकारे आपल्या टीमचा रोष पत्करलेला पराग पुन्हा एकदा आपल्या टीमचा विश्वास परत मिळवू शकेल का, हे येत्या काही दिवसांमध्ये कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive