By  
on  

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात किशोरी शहाणेंनी शेयर केल्या पहिल्या सिनेमाच्या आठवणी

'बिग बॉस मराठी 2' मध्ये टास्‍क पूर्ण करताना तसेच स्ट्रॅटेजीज आणि खेळांचे डाव आखताना 'बिग बॉस' मधील  स्पर्धक अखेर त्यांच्या व्यावसायिक व व्यक्तिगत आयुष्यांबद्दल गप्पा मारत एकमेकांच्या जवळ येताना दिसू लागले आहेत.

 मराठी सिनेमा क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसातील अनुभव आपल्यासोबत बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या स्पर्धकांना सांगितले. त्या म्हणाल्या, “मी कॉन्व्हेंट शाळेची असल्यामुळे मराठी इंडस्ट्री माझ्यासाठी खूप नवीन होती. आसपास मराठमोळं  परिसर नसल्यानेच मराठी बोलायची इतकी सवय नाही. फार फार तर आपल्या फॅमिलीमध्येच मराठी बोलायची सवय होती. बाकी सगळे नॉन-महाराष्ट्रीयन.”

किशोरींनी नंतर ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्या चित्रपटाच्या डबिंगसाठी फोन येईल अशी वाट बघत होत्या. शेवटी त्यांनीच फोन करून विचारले तेव्हा त्यांना कळले की, त्याचा भाग त्यापूर्वीच दुसरं कोणीतरी डब केला होता.

ही घटना त्यांनी आव्हानासारखी स्वीकारली आणि आपले मराठी उच्चार दुरुस्त करण्यासाठी कठोर मेहनत घेतली. त्यानंतरचा त्यांचा दुसरा चित्रपट सचिन पिळगावकर यांचा ‘माझा पती करोडपती’ होता. त्यात त्यांनी स्वत:च्याच आवाजात डबिंग केले.

किशोरींचा हा किस्सा ऐकून वीणा, शिवानी, रूपाली आणि उपस्थित असलेले सगळेच अवाक झाले. बिग बॉस मराठी 2 मधील अशाच न पाहिलेल्या प्रेक्षकांना Voot अॅप वर पाहता येतील.

Recommended

PeepingMoon Exclusive