By  
on  

‘बिग बॉस मराठी 2’ च्या घरात काल रंगला ‘weekend चा डाव’

काल बिग बॉसच्या घरात या सीझनचा पहिला ‘weekend चा डाव’ रंगला. मागच्या आठवड्यानंतर या शनिवारी महेश मांजरेकर स्पर्धकांना भेटायला आले. एरवी एकमेकांची उणीदुणी काढणा-या बिचुकले आणि शिवानी यांच्यातलं वेगळं नातं बघायला मिळालं. एरवी कोणत्याही काम करायला खास अ‍ॅटिट्युडने नकार देणा-या बिचुकलेंनी यावेळी शिवानीचं मात्र ऐकलं. बिचुकलेंच्या बेडजवळ जो पसारा होता तो शिवानीने प्रेमळ दमदाटी करुन त्यांना आवरायला लावला. हे सगळं होईतो या सीझनच्या त्यानंतर पहिल्या कॅप्टनपदाच्या task ला सुरुवात झाली. एकीकडे वीणा शिवसाठी प्रचार करत होती. त्यासाठी वीणाने सगळ्यांशी गोड बोलत शिवला मत देण्याचं आवाहन केलं.

एकीकडे हे सुरु असताना नेहाच्या टीमची देखील जोरदार तयारी सुरु होती. नेहाच्या प्रचाराची धुरा बिचुकलेंच्या हाती होती. ते नेहा शितोळेसाठी सर्व सदस्यांमध्ये प्रचार करत होते. अत्यंत औत्सुक्यपुर्ण वातावरणात निवडणुका पार पडल्या. यावेळी शिवला जास्त मतं मिळाली आणि बिग बॉस मराठीचा पहिला कॅप्टन शिव झाला. यानंतर शोची धुरा मांजरेकरांनी हाती घेतली. नेहमीच्या खास शैलीत सदस्यांची खरडपट्टी काढली. अभिजीत बिचुकलेंवर सतत आरोप केल्यामुळे आणि त्यांना टारगेट केल्याने त्यांनी बिचुकलेची बाजु घेत रुपाली भोसलेला फैलावर घेतलं. पण रुपालीला मोठ्या आवाजात जाब विचारणा-या पुढे माधव देवचकेला महेश मांजरेकरांनी मोठ्या आवाजात रागावर नियंत्रण ठेवण्यास करण्यास सांगीतले. वातावरण तंग झालंय असं वाटत असतानाच महेश मांजरेकरांनी बिचुकलेंची फिरकी घेतली. बिचुकलेंच्या आगळ्यावेगळ्या इंग्रजीवर एक Video Clip दाखवण्यात आली. त्यातही महेश मांजरेकर बिचुकलेंच्या भाषेची आणि शब्दांची पाठराखण करताना दिसून आले. बिचुकलेंची जी थोडी शिवराळ भाषा आहे त्यालाही मांजरेकरांनी "ती त्यांची साता-याची मुळ भाषा आहे" म्हणुन पाठींबा दिला. एकंदरीत कालचा भाग हा ब-याच नाट्यमय घडामोडींबनी रंगला होता. आजच्या भागात काय रंगत येते ते लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive