By  
on  

‘बिग बॉस मराठी २’मध्ये या आजारी व्यक्तीची काळजी घेत आहेत माधव आणि वीणा

बिग बॉसमध्ये आता सदस्यांना एकत्र येऊन काहीच दिवस झाले आहेत. पण असं असलं तरी सदस्यांमध्ये चांगली बाँडिंग दिसून येत आहे. वूटवरील अनसीन अनदेखा मधील व्हिडियोमध्येदेखील असंच काहीसं दिसून येत आहे. घरात आजारी असलेल्या शिवानी सुर्वेची माधव देवचके आणि वीणा जगताप काळजी घेताना दिसत आहेत. या व्हिडियोत माधव शिवानीला सांगतो, ‘औषधांची माहिती असलेला कागद जपून ठेव. तो कामाला येतो नंतर. औषधाची वेळ, औषध घेण्याची पद्धत हे सगळं लक्षात ठेवावं लागतं. तुझ्या लक्षात रहात असेल तर कागद टाक. पण शक्यतो असं करू नको तो कागद ठेव जपून.

वीणाने तर शिवानीच्या आईची भूमिकाच घेतली आहे. ती वेळेवर जेवते आहे की नाही, औषध घेते आहे की नाही वीणा ही काळजी घेताना दिसत आहे. घरातील हे सगळं आलबेल असण्यामागचं कारण एलिमिनेशनची भीती हे आहे का? एरवी एकमेकांशी सतत भांडत असणारे हे स्पर्धक एकमेकांना मदत करत आहेत. असो शिवानी लवकर बरी होवो आणि ही नवी मैत्री अत्यंत चांगली बहरो हीच चाहत्यांची इच्छा असणार.

Recommended

PeepingMoon Exclusive