By  
on  

बिग बॉसच्या घरातील ‘weekendचा वार’ ठरला ‘फनी गेम्स’चा

आज बिग बॉस शोच्या सुरुवातीला वीणाला कसं वाटतंय विचारलं असता तिने बिचुकलेवर आरोप केला ती म्हणते, ‘बिचुकलेंना जे शिव्या घालतात त्यांच्याबद्दल बिचुकले स्ट्रॅटेजी ठरवतात. आणि आम्ही काहीच करत नाही तरी आम्हाला मागुन बोलतात.’ एकीकडे बिचुकले आणि वीणामध्ये वाद होत होता तर दुसरीकडे बिचुकले आणि शिवानी यांच्यात पुन्हा मैत्री होतेय. म्हणुन मांजरेकरांनी दोघांना 'ये दोस्ती' हे गाणं गायला सांगितलं.

https://www.instagram.com/p/ByN2281FIdU/?utm_source=ig_web_copy_link

घरातील चॉकलेटबॉय शिवने शिवानीला महेश मांजरेकरांच्या सांगण्यावरून प्रपोज केलं. शिवने शिवानीला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला. पण शिवानीने त्याचा बार फुसका ठरवला. बिग बॉसच्या घरात यावेळी एक आगळी वेगळी थीम ठरवली गेली. बिग बॉस बघणा-या प्रेक्षकामधून एकाची निवड केली जाईल. त्या प्रेक्षकाने चुकिचं वागणा-या सदस्याला शिक्षा ठोठावायची. यावेळी आलेल्या एका महिला प्रेक्षकाने सगळ्यात आधी शिवानीचं नाव घेतलं गेलं. ती घरातील नागीण असल्याचं तिने नमूद केलं. यावर शिक्षा म्हणून तिला नागीण डान्स करण्यास सांगितलं गेलं.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1135120417943937024

त्यानंतर नेहा नेहा उगाच वाद करते आणि दिगंबरचं तीने नाव घेतलं फक्त आणि त्याला मालवणी बोलायची शिक्षा सांगितली. यावेळेच्या शोमध्ये आणखी एक वेगळी थीम होती ती म्हणजे चुगलीची. यावेळी प्रत्येक सदस्य अ‍ॅक्टीव्हीटी बॉक्समध्ये जाईल. प्रेक्षक त्याला सांगतील की कोणी त्याच्याबद्दल चुगली करत असतं. या नवीन थीमला सदस्यांनी खुप एंजॉय केलं.सगळ्यात कसोटी होती ती नॉमिनेशन वेळी. यावेळी नेहा, शिव, शिवानी आणि रुपाली नॉमिनेट होते. यावेळी कोणी एलिमिनेट नाही झालं. यावेळी सगळेच सेफ असल्याने सदस्यांनी आनंद व्यक्त केला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive