By  
on  

अभिनेत्री स्पृहा जोशीचा हा नवा बॉयफ्रेंड आहे जरा हटके

आजकाल बॉयफ्रेंड असणं काही नवी बाब राहिली नाही. पण इतरांपेक्षा वेगळे गुण असणारा बॉयफ्रेंड असणं ही मात्र हटके बाब आहे. अभिनेत्री स्पृहा जोशीला देखील असा हटके बॉयफ्रेंड मिळाला आहे. स्पृहाने नुकतीच एक अ‍ॅड शूट केली. त्यात ती एका सॉफ्ट ड्रिंकशी बोलताना दिसते. तो ड्रिंक टीन स्पृहाचा कशाप्रकारे चांगला बॉयफ्रेंड होऊ शकतो हे पटवून सांगताना दिसतो. विशेष म्हणजे स्पृहाला त्याचे सगळे मुद्दे पटतात देखील आणि ही अ‍ॅड संपते.

https://www.instagram.com/p/ByMebKCn1Ai/?utm_source=ig_web_copy_link

स्पृहा खुप दिवसातून एखाद्या अ‍ॅडमधून रसिकांच्या भेटीला आली आहे. एरवी साडीत दिसणारी स्पृहा यात ऑफ शोल्डर टॉप आणि शॉर्ट्समध्ये दिसते. स्पृहाने हा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना ती म्हणते, ‘माझ्या boyfriend पेक्षा हा better आहे असं म्हणणं आहे याचं’…. स्पृहा आगामी ‘वेलकम होम’ या सिनेमातून रसिकांच्या समोर येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive