By  
on  

बिग बॉस मराठी 2: आज वैशाली आणि वीणामध्ये पडणार वादाची ठिणगी

'बिग बॉस मराठी 2'  मराठीच्या च्या घरात आता नवनवीन डावपेच रंगू लागले आहेत. सध्या पोपटाचा पिंजरा हा टास्क सुरु आहे. या टास्कमध्ये घरातील अनेक सदस्यांमध्ये भांडणं होताना दिसत आहेत. आतापर्यंत घरामध्ये अनेक जणांमध्ये भांडणं होताना दिसली. यात आजच्या भागात वैशाली माडे आणि वीणा जगताप यांच्यात सुद्धा कडाक्याचं भांडण होताना दिसणार आहे.

आतापर्यंत बिग बॉसच्या घरात शांत आणि तितकीच संयमी वाटणारी विणा जगतापच्या स्वभावाचे वेगळेच पैलू समोर येतआहेत. सध्या ती घरामध्ये अनेक वेळा स्वत:ला सिद्ध करताना, तिचे विचार स्पष्टपणे मांडताना दिसून येते. नुकताच वीणाचं बाप्पा जोशींसोबत बाचाबाची झाली. अशाचच आता विणाचं पुन्हा एकदा घरातल्या सदस्यासोबत भांडण होताना दिसणार आहे. आजच्या भागात वीणा आणि वैशाली या दोघींचं भांडण होताना दिसणार आहे, मात्र हे भांडण नक्की कोणामुळे झाले ते आजच्या भागातच पाहायला मिळेल.

https://www.facebook.com/ColorsMarathi/videos/446231562605448/

वैशाली आणि वीणा या दोघींमध्ये बोलण्याच्या शैलीवरुन किंवा भाषेवरुन भांडण झाल्याचं पाहायला मिळणार आहे. वैशालीने रुपालीशी बोलताना केलेल्या शब्दांच्या गैरवापरामुळे वीणा आणि वैशालीमध्ये वादाची ठिणगी पडली आणि हा वाद वाढत गेला. ज्यामध्ये वैशालीने वीणाला बरच काही सुनावले आहे. वीणा सुद्धा वैशालीला चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

या भांडणामागचे नेमके कारण काय, आणि या दोघी एकमेकांवर एवढ्या का चिडल्या हे बिग बॉसच्या आजच्या भागात कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive