By  
on  

बिग बॉस मराठी 2 : 'चोरीचा मामला' अन् बिचुकलेही थांबला!

'बिग बॉस मराठी 2' मध्ये सध्या 'चोरीचा मामला' हा टास्क सुरु आहे. या टास्कमुळे गेले दोन दिवस सध्या घरात एक वेगळीच रंगात बघायला मिळत आहे.

बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले आणि शिवानी यांच्यामध्ये या टास्क दरम्यान एक वेगळी गम्मत बघायला मिळणार आहे. अभिजीत बिचुकले यांच्या वस्तू दुसऱ्या टीममधील सदस्यांनी लपवल्या आहेत. यामध्ये वीणाचा सुद्धा सहभाग असल्याची दाट शंका बिचूकलेंना आहे.

https://www.instagram.com/p/ByU_sEfAE0l/

यामुळे बिचुकले हे वीणाजवळ येऊन त्यांच्या वस्तू परत देण्याची विनंती करत आहे. यावेळी बिचूकलेंसोबत शिवानी सुद्धा दिसून येत आहे. बिचुकले वीणाला अत्यंत प्रेमळ शब्दात विनंती करताना दिसत आहे. परंतु वीणाने मात्र या गोष्टीला नकार देऊन ''तुमच्या वस्तू परागजवळ आहेत, तुम्ही परागला विचार आणि माझं डोकं खाऊ नका'' असं ती बिचूकलेंना सांगताना दिसत आहे.

आता बिचुकले स्वतःच्या वस्तू कशा आणि कोणाकडून मिळवतात, हे बिग बॉसच्या आजच्या भागात कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive