पळून आलेल्या अभिरामच्या नजरेस पडली आण्णांची रासलीला, काय घडणार आता

By  
on  

उत्तरोत्तर गडद होत जाणा-या रात्रीप्रमाणे ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका रंगत चालली आहे. एकीकडे आण्णा शेवंताची रंगणारी केमिस्ट्री तर दुसरीकडे वच्छीची सुडभावना. या सगळ्यामध्ये कोकणातील निसर्गरम्य वातावरणात रंगलेली ही कथा बहरत चालली आहे. आण्णाचं वरचेवर शेवंताकडे येणं हे घरातल्यांना प्रत्येकाला माहीत असतं. पण आण्णांच्या धाकाने कोणीच काही बोलत नाही. आता लिहियला वाचायला येत असलेल्या अभिरामाला आण्णांनी बोर्डिंगला पाठवायचा घाट घातला आहे.

https://www.instagram.com/p/ByVSmOyHIsK/?utm_source=ig_web_copy_link

अभिरामाच्या हाती जमिनीची कागदपत्रं पडू नयेत. तसेच आपला काळा व्यवहार त्याच्या समोर येऊ नये यासाठी त्याला बोर्डिंगला पाठवायचं ठरवतात. त्याला बोर्डिंगला पाठवलंही जातं. पण घरच्या ओढीने अभिराम तिथून पळून येतो. घाबरलेला अभिराम रस्ता चुकतो आणि शेवंताच्या घरी पोहोचतो. तिकडे शेवंताच्या घरी आण्णा आणि शेवंताची रासलीला रंगात आलेली असते. शेवंता आण्णांना मी तुमची कोण असं विचारते त्यावेळी आण्णा ‘तु माझी बायको असा’ असं मोठ्याने ओरडतात. त्याचवेळी अभिराम तिथे पोहोचतो. तो हे आण्णांचं बोलणं ऐकतो आणि शेवंताला आण्णांच्या मिठीत पाहतो. याचा धक्का बसलेला अभिराम घरी पोहोचतो. घरी येऊन सर्वांना मला पुन्हा बोर्डिंगला जायचं आहे असं सांगतो. यावर घरची मंडळी आवाक होतात. अभिराम परत आलाय हे समजताच आण्णा त्याला काय शिक्षा करतील? हे प्रेक्षकांना पुढच्या भागात पाहाता येईल.

Recommended

Loading...
Share