By  
on  

बिग बॉस मराठी 2: किशोरी शहाणे आणि नेहा शितोळे यांच्यात जोरदार वाजलं!

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात उत्तरोत्तर रंगात चढत आहे. जसजसे दिवस पुढे सरकत आहेत तसं स्पर्धकांमधले परस्पर संबंध सुद्धा कमी अधिक प्रमाणात बदलताना दिसून येत आहेत. आतापर्यंत अनेक स्पर्धकांमध्ये वाद झालेले पाहायला मिळत आहेत.

नुकतंच किशोरी शहाणे आणि नेहा शितोळे यांच्यात खटका उडाल्याचा पाहायला मिळाला. किशोरींनी नेहाला काहीतरी विचारलं. त्यावर नेहाने ''तुमची माणसं तुम्हाला सांगतील'', असं उत्तर दिलं. नेहाकडून मिळालेलं हे उत्तर किशोरी शहाणेंना पटलं नाही.

असं उद्धटपणे उत्तर दिल्याने किशोरींनी नेहाला सुनावलं.''मी तुला आपलं म्हणून काहीतरी विचारलं आहे, तर तू माझ्याशी असं बोलतेस. माझ्याशी प्लीज असं बोलु नकोस. मी इथे जरी स्पर्धक म्हणून आले असले तरी काहीतरी मी घेऊन आलेय. इतकी वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये मेहनत केलीय''

या वादात परागने सुद्धा उडी घेतलं. घरात जेवणावरून जे राजकारण होत आहे त्यावरून परागने नेहाला सुनावलं. या सर्व वादामध्ये किशोरी थोड्या भावुक झाल्या.

आता बिग बॉसच्या घरात यापुढे कोणामध्ये मैत्री होणार आणि कोणामध्ये भांडणं होणार हे बिग बॉसच्या पुढच्या भागात कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive