By  
on  

बिग बॉस मराठी 2: बिग बॉसच्या कठोर निर्णयामुळे हे दोन सदस्य जाणार का घराबाहेर?

बिग बॉसच्या घरात 'चोर बाजार' हे आठवड्याचा टास्क नुकताच पार पडला. या टास्क दरम्यान अनेक सदस्यांमध्ये धक्काबुक्की तसेच भांडणं झाली.

परंतु याच टास्क दरम्यान वीणा आणि शिवानी यांनी भांडणासोबत एकमेकींवर हात सुद्धा उचलले. बिग बॉसच्या घरात कुठल्याही प्रकारची शारीरिक हिंसा अमान्य आहे. हा नियम सदस्यांना माहीत असूनही वीणा आणि शिवानी यांचा राग अनावर झाला आणि दोघींनी एकमेकांवर हात उचलला.

यानंतर शिवानी आणि वीणाने टास्कचा नियम मोडला शिवाय त्यांनी आपल्या वागण्याचे समर्थन सुद्धा केले. हि घटना झाल्यानंतर अशी घटना पुन्हा घडू नये, म्हणून बिग बॉसनी या दोघींना घरात राहण्यास अपात्र ठरवले. बिग बॉसच्या या अनपेक्षित निर्णयाने इतर सदस्यांना धक्का बसला.

बिग बॉसच्या या निर्णयाप्रमाणे या दोघी घराबाहेर जाणार की या दोघींना बिग बॉस एखादी वेगळी शिक्षा ठोठावणार हे लवकरच प्रेक्षकांना कळून येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive