By  
on  

बिग बॉस मराठी 2: बिचुकले यांनी आळवलाय शिवानीसाठी गाण्याचा सूर

'बिग बॉस मराठी 2' च्या घरात काही दिवसांपासून शिवानी आणि अभिजीत बिचुकले यांच्यात मैत्री होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात या दोघांमध्ये भांडणं आणि वाद दिसून आले होते.

परंतु गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये मैत्री वाढताना दिसत आहे. नुकतंच शिवानीने बिचूकलेंना स्वच्छतेचे धडे देऊन त्यांच्या बेडजवळचा पसारा आवरायला सांगितला होता. बिचूकलेंनी सुद्धा शिवानीचं म्हणणं निमूटपणे ऐकलं आणि आपल्या बेडजवळचा पसारा आवरला.

 

बिग बॉसच्या घरातल्या अशाच निवांत क्षणी बिचुकले आणि शिवानी गप्पा मारत बसले होते. तर तेव्हा बिचूकलेंनी ''मी तुझ्यासाठी गाणं गाऊ का?'' अशी प्रेमळ विनंती केली. त्यावेळी ''गा, पण चांगलं गा!'' असं शिवनीने बिचूकलेंना सांगितलं. यानंतर बिचूकलेंनी 'तूमसे मिलना बाते करना बडा अच्छा लगता हे' हे गाणं खास त्यांच्या शैलीत गायलं.

आता या गाण्यावर शिवानीची प्रतिक्रिया काय आहे? बिचूकलेंनी गायलेलं गाणं शिवानीला आवडलं आहे का? याची उत्तरं प्रेक्षकांना आजच्या भागात कळतील .

https://www.instagram.com/p/ByZrpXFArrg/

 

Recommended

PeepingMoon Exclusive