By  
on  

मुलींना फक्त ‘बॅड बॉईज’च का आवडतात? विचारतोय, अमेय वाघ

आपल्याला एक तरी ‘गर्लफ्रेंड’ असावी असं प्रत्येक तरुण मुलाला वाटत असतं. पण सगळेच भाग्यवान नसतात. आता नचिकेत उर्फ अमेय वाघही गर्लफ्रेंडच्या शोधात आहे. पण गुड बॉय असलेल्या अमेयला त्याची गर्लफ्रेंड मिळते का हे सिनेमामध्ये कळेलच. या सिनेमाचा तिसरा टीजर रिलीज झाला आहे. ह्यूज प्रॉडक्शन्स आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गर्लफ्रेंड’ च्या टीजरमध्ये अमेय आपल्या कुटुंबाबरोबर ‘१४ फेब्रुवारी’ला वाढदिवस साजरा करताना दिसतो. मुळात वाढदिवशी आनंदी होण्यापेक्षा आपलं वय वाढतंय आणि आपण अजूनही सिंगल आहोत, या विषयीचे शल्य त्याच्या मनात दिसते. त्यात कुटुंब, मित्र, ऑफिसमधील सहकारी आणि बॉसबरोबर असणारी त्याची केमेस्ट्री देखील इंटरेस्टिंग पद्धतीने समोर येते.

 

या टीजर मध्ये सई अमेयला समजून घेण्याचा प्रयत्न करत “तुला कधीच गर्लफ्रेंड नव्हती?” असा प्रश्न विचारते. यामुळे अमेय मधील सिंगल तरुण अधिक भाऊक होऊन तिला मुलींना माझ्यासारखे ‘गुड बॉईज’ का आवडत नाहीत याचा पाढा वाचून दाखवतो. आता त्याच्या गुडी गुडी इमेजला पाहून अलिशा इम्प्रेस होते का ते कळेलच. ‘गर्लफ्रेंड’चे लेखन, दिग्दर्शन उपेंद्र सिधये यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे. या चित्रपटात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्यासह सागर देशमुख, इशा केसकर, रसिका सुनील, सुयोग गोऱ्हे, यतीन कार्येकर, कविता लाड, उदय नेने अशी तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. हा सिनेमा २६ जुलैला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive