By  
on  

हटके वळणावरच्या प्रवासाची गुलाबी गोष्ट : 'मुंबई पुणे मुंबई' ९ वर्षं पूर्ण

 

आपल्यापैकी अनेकजण प्रवास करत असतात. प्रत्येकाच्या प्रवासाचा हेतू असतो. पण नकोशा असलेल्या प्रवासात काही हव्याश्या बाबी घडल्या तर सगळा प्रवास सुंदर होत जातो. नेमकी अशाच मार्गाने जाणारी एक लव्हस्टोरी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी पडद्यावर आणायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला. आज त्या लव्हस्टोरीला जवळपास 9 वर्षं पुर्ण झाली आहेत. काहीशी हटके वळणावर असलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ या सिनेमाच्या प्रवासाला आज ९ वर्षं पुर्ण झाली. इतक्या कालावधीनंतरही या सिनेमाची जादू कायम आहे.

संपुर्ण सिनेमाभर एकच ड्रेस, नायक आणि नायिकेचे दर पाचव्या मिनिटाला उडणारे खटके आणि संपुर्ण सिनेमाभर प्रवास असा नॉन फिल्मी मसाला असूनही या सिनेमाने स्वत:चा असा एक खास प्रेक्षकवर्ग तयार केला. या सिनेमाने गौतमला म्हणजेच स्वप्नील जोशीला ख-या अर्थाने मराठी सिनेमाचा चॉकलेट बॉय बनला. या सिनेमात गौरी साकारणारी मुक्ता प्रत्येकालाच आवडली. नेहमी पठडीबाहेरच्या भूमिका साकारणा-या मुक्ताने गौरी साकारून ती अभिनयाच्या प्रत्येक परिघात सहज सामावू शकते हे सिद्ध केलं.

‘मुंबई पुणे मुंबई’ या सिनेमाची लोकप्रियता पाहूनन सतीश यांनी दुस-या भागाची निर्मिती केली. एकमेकांच्या प्रेमात पडलेले गौरी आणि गौतम आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतात. प्रेमाचा हा लग्नवेदीपर्यंत होणारा प्रवास रसिकांना सुखावून गेला. यानंतर आलेल्या तिस-या भागालाही रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. लग्नानंतरच्या गोड बातमीचा आनंद गौरी आणि गौतमने रसिकांसोबत शेअर केला. आजही हा सिनेमा टीव्ही लागला की कुटुंब एकत्र बसून त्याचा आनंद घेतं, हाच या सिनेमा टिकून राहिलेला करिष्मा आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#9yearsofMPM ️

A post shared by Swwapnil Joshi App Now Live! (@swwapnil_joshi) on

Recommended

PeepingMoon Exclusive