By  
on  

फोर्ब्सच्या टॉप 10 यादीत खिलाडी कुमारने टाकले दबंग खानला मागे

फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणा-या टॉप 10 सेलब्रिटींची यादी जाहीर केली आहे.जाहीर करण्यात आलेल्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमार आणि सलमान खान यांनी आपले स्थान पटकावले आहे. पण महत्त्वाचं म्हणजे या यादीत सलमानपेक्षा वरचा क्रमांक पटकावत खिलाडी कुमारने बाजी मारली आहे.

यंदाच्या 2018 च्या टॉप 10 सेलिब्रिटींच्या यादीत हॉलिवूड अभिनेते जॉर्ज क्लूनी प्रथम क्रमांकावर आहेत. 283 कोटींची वर्षाला कमाई करणा-या अक्षयने या यादीत सातव्या क्रमांक पटकावला असून तर सलानने 269 कोटींची कमाई करुन या यादीत आठवे स्थान मिळवले आहे.

https://twitter.com/Forbes/status/1032285019539156992

 

फोर्ब्सच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनसुध्दा या यादीबाबतची माहिती जाहीर झाली. तसंच वर्षभरात सर्वाधिक मानधन घेणारे हे सेलिब्रिटी असल्याचे यावरून सिध्द होत आहे. कमाई आणि प्रसिध्दी या निकषांवरुनच फोर्ब्सने ही यादी जाहीर केली.

खिलाडी कुमार आता प्रसिध्दी बरोबरच कमाईतसुध्दा सर्वांनाच मागे टाकतोय, हे सिध्द होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive