दिग्दर्शक अजय फणसेकर झाले आहेत आता 'सीनियर सिटीझन'

By  
on  

 'रात्र आरंभ’, ‘एनकाऊंटर’, यही है जिंदगी  "एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर' असे उत्तमोत्तम सिनेमे बनवलेले अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अजय फणसेकर आता "सीनियर सिटिझन"कडे वळले आहेत. अर्थात "सीनियर सिटिझन" हा त्यांचा नवा सिनेमा असून, या सिनेमाच्या शूटिंगला आता लवकरच सुरु होणार आहे.

 'ॐ क्रिएशन्स' ही निर्मिती संस्था या सिनेमाची निर्मिती करत आहे. सिनेमाचा विषय, त्यातील कलाकार या विषयींचा तपशील अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र आजपर्यंत अजय फणसेकर यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास "सीनियर सिटिझन"ही प्रेक्षकांना नक्कीच सरप्राइज ठरेल असं आवर्जून म्हणता येईल. 

'सीनियर सिटिझन' हा एक थ्रिलरपट आहे. एक वेगळं कथानक या सिनेमातून प्रेक्षकांना पहायला मिळेल, असं अजय फणसेकर यांनी सांगितलं

Recommended

Loading...
Share