संजय दत्तच्या मराठी सिनेमाच्या नावाची घोषणा, 'बाबा' येतॊय प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

सध्या हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मातब्बर मंडळींना मराठी सिनेसृष्टी भुरळ पडते आहे. अमिताभ बच्चन पासून ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून यशस्वी पाऊल रोवले आहे. यामध्ये संजय दत्तचं सुद्धा नाव आता समाविष्ट झालं आहे. 

संजय दत्त आपल्या 'संजय दत्त प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत पहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती करत असून 'बाबा' असं या सिनेमाचं नाव असणार आहे. राज गुप्ता हे नामवंत दिग्दर्शक या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. 

या सिनेमाचं नाव आधी 'पोपटपंची' असं असणार होतं. परंतु आता या सिनेमाचं नाव 'बाबा' असं ठेवण्यात आलेलं दिसून येत आहे. स्पृहा जोशी ही या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणार असून तिच्यासोबत हिंदीतला प्रयोगशील कलाकार दीपक डोब्रियाल महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 

मनीष सिंग यांनी हा सिनेमा लिहिला असून, 'बाबा' हा सिनेमा २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

Loading...
Share